पैसे नसतानाही व्यवस
पैसे नसतानाही व्यवसाय सुरु करा.
तुम्ही बाय प्रोफेशन कोणी असाल टीचर,स्टुडंट, इंजिनिअर,डॉक्टर, शेतकरी,टूरिझम क्षेत्र,कार्पोरेट, डिझायनर,फोटोग्राफर,लेखक,आर्टिस्ट,गृहीणी तुम्ही हे सहज करू शकता.
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि इच्छाशक्तीचा वापर करा. तर हा एकमेव मार्ग असा आहे त्यातून आपण आपली स्वप्न पूर्णत्वास नेऊ शकता.
कोणताही नवा व्यवसाय करताना आपले ध्येय ठरलेले असते.
आपल्याला मिळालेले यश कसे असेल आणि त्या यशाच्या शिखरावर गेल्यावर आपण काय करणार आहे, हे सगळे ठरलेले असते परंतु आपण तिथे पोहोचायचे कसे? कधी पोचणार असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात येतात. या सगळ्या मदतीसाठी मी श्वेता आपल्या बरोबर कायम असणार.
![]() |
Fianancial Security Experts. समृद्धीचे श्वेतपत्रिका या प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे. गेली पंचवीस वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत आहे. येत्या पाच वर्षात मला पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्धी मिळवून देण्याचे ध्येय आहे.

कोणत्याही व्यवसायात संयम महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायात कोणतीही अडचण आली तरी खचून न जाता व्यवसायात वाढ कशी होईल याचा संयमाने विचार करणे गरजेचे आहे. आपण कोणत्या गोष्टी विकू शकतो का? विक्री करण्याच्या विविध पद्धती शिकण्याची तयारी आहे का? आपली गोष्ट किंवा आपले मत दुसऱ्याला पटवून देणे ही एक प्रकारची विक्री कलाच आहे. नवीन काळानुसार बदलणाऱ्या विक्री करण्याच्या विविध पद्धतीने तुम्ही शिकणे अवगत करणे गरजेचे आहे. तुमचा व्यवसाय लोकांना दिसला माहिती झाला तरच लोक आपल्याकडून काही तरी विकत घेतील.
![]() |
तुमचा व्यवसाय लोकांना दिसला माहिती झाला तरच आपल्या कडून काहीतरी विकत घेतील. यासाठी डिजिटल मार्केटिंग असे नवे तंत्र स्वतःला अवगत करून घेणे ही काळाची गरज आहे. त्यामध्ये फेसबुक,ट्विटर, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, याहू, ब्लॉग यूट्यूब,पोडकास्ट ,गुगल त्यांचा वापर करून आपण आपली जाहिरात करू शकतो.
आपण एखादी वस्तू विकतोय म्हणजे त्याचा कमीपणा आहे असा न्यूनगंड मनात बाळगू नका. याउलट मी ही सेवा देतोय, त्या कुटुंबाची काळजी करणारा हितचिंतक आहे. याचा या कुटुंबाला फायदा होणार आहे हे पटवून सांगणे हे माझे काम आहे हा विचार करा.
![]() |




खूप छान मार्गदर्शन
ReplyDeleteKhup chan
ReplyDeletepowerful
ReplyDelete