आर्थिक नियोजनाची दशसुत्री
नमस्कार 🙏
चांगला आयुष्य जगायचं असेल तर पैसा हवाच. त्यासाठी आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे ते करताना पुढील मुद्दे लक्षात घेतले पाहिजे.
![]() |
1) आपल्या आयुष्याचा विचार करताना गुंतवणूक किती कालावधीसाठी करत आहोत, कालावधी पूर्ण झाल्यावर आपण गुंतवलेली रक्कम त्या वेळेस चे मूल्य किती असेल याचा अंदाज घ्या. त्यावेळेच्या महागाईचा विचार करणे खूपच गरजेचे आहे.
2) गुंतवणूकीची काळजी घ्या.
बरेच गुंतवणूकदार एकदा गुंतवणूक केली की निर्धास्त होतात. त्यांना वाटते की परतावा तर मिळणार आहे या भ्रमात न राहता आपल्या गुंतवणुकीच्या सर्व बाबींवर नियमित आणि योग्य देखरेख ठेवली पाहिजे.
3) मुदतीवर करा विचार.
गुंतवणूक करताना योग्य परतावा मिळण्यासाठी काही अवधी जावा लागतो. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या योजनेमधून कमी कालावधीत चांगल्या परताव्याची अपेक्षा करू नका. म्युचल फंड, फिक्सडिपॉझिट,पीपीएफ यासारखे गुंतवणुकीचे पर्याय दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर असतात. प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असतो. एवढी चा कालावधी दोन ते पाच वर्षे असू शकतो. पण विमा पॉलिसी चा मिळणारा रिटर्न ही दीर्घकालीन गुंतवणूकीवरच प्राप्त होतो. या गोष्टी समजून घेऊन आपल्या गरजांनुसारच वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी.
4) कागदपत्रांची घ्या काळजी.
खूप वेळा आपल्या गुंतवणुकीचे कागदपत्र योग्य पद्धतीने न ठेवल्यामुळे विमा हरवल्यामुळे गुंतवणुकीचे परतावा मिळत नाहीत. कागदपत्रांचे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. आपण केलेल्या गुंतवणुकीची कल्पना कुटुंबातील सदस्यांना आवश्यक द्या.
5) तुमच्या भविष्यासाठी.
नोकरदार महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता देण्यासाठी नोकरी करतात. परंतु आपल्या अनुपस्थितीत कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घ्या. यासाठीच आम्ही श्वास घेणे आर्थिक स्थिरतेसाठी फायदेशीर ठरते. याशिवाय पेन्शन त्यामुळे आर्थिक स्थिरता मिळते.
6) निवडा वेगवेगळे पर्याय.
गुंतवणूक करताना वेगवेगळ्या जखमींचा विचार करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीमध्ये विविधता असायला हवी. यामध्ये जीवन विमा रिअल इस्टेट कमोडिटी इक्विटी असे पर्याय असावेत. यामध्ये आपली आर्थिक जोखमीची सांगड असावी.
7) भविष्यातील अप्रिय घटनांसाठी.
जेव्हापण वर्तमान काळात जगत असताना भविष्याचा विचार करून गुंतवणूक करता तेव्हा काश्मीर घटनांचा सुद्धा विचार करणे गरजेचे असते. विशेषता महिलांना घटस्फोट मृत्यू अशा प्रिया घटनांना तोंड देण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असते. जीवनामध्ये आकस्मिक परिस्थितीमध्ये आपण केलेली गुंतवणूक आपल्याला संजीवनी देईल.
8) निर्णयावर ठाम राहा.
आपण निवडलेला गुंतवणूक योजनांवर ठाम राहा. भविष्यातील गरजांचा विचार करून आर्थिक नियोजन करा.
9) मला स्वतःचा अर्थतज्ञ.
गुंतवणूक करताना स्वतः योजनांचा अभ्यास करावा. इंटरनेटच्या माध्यमातून आपण गुंतवणूक पर्याय शोधू शकता. गरज पडल्यास बँका अधिकार्यांशी स्वतः भेटून शंकांचे निरसन करू शकता.
10) थेंबे थेंबे तळे साचे.
स्वतःला बचतीची सवय लावा. कोटी कोटी बचत करून टप्प्याटप्प्यात गुंतवणूक करत अगदी पाचशे ते हजार रुपये दरमहा गुंतवणूक केल्यास आठ वर्षात त्याचे करमुक्त एक लाख रुपये होतात.
मी श्वेता अंबुर्ले. समृद्धीचे श्वेतपत्र या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. फायनान्शिअल सिक्युरीटी एक्सपर्ट. गेली पंचवीस वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत आहे. येत्या पाच वर्षात मला पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्धी मिळवून देणं हे माझं ध्येय आहे
.तर मग कराना विचार आपल्या गुंतवणुकीचा आणि सुरक्षित आर्थिक नियोजनाचा. हा माझा ब्लॉग आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खालील लिंक वर क्लिक करा.https://www.facebook.com/shweta.amburle या नं वर कॉल करा 7039226921🙏🙏




Comments
Post a Comment