पैसा आणि आरोग्य
नमस्कार🙏
पैसा आणि आरोग्य
जीवन जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा घटक आहे. मनुष्याची सगळी धडपड पैसा कमवण्यासाठी तर असते. दिवसभर काम करायचे, कोणी मानसिक श्रम करीत असतात पण शारीरिक श्रम करून दिवसभर बसून कॉम्प्युटरवर काम करत असतात. डोळे डोकं शरीर अगदी थकून जाते. नाही कष्ट करून जगणे ही कठीणच. या सगळ्यात आपण जीवनात आनंद विसरून जातो. मनुष्य जगायला विसरतो. आयुष्यात दैनंदिन गरजा वाढत आहेत. महागाईच्या काळात खूप पैसा महत्त्वाचा झाला आहे. प्रत्येकाची इच्छा असते आपले सुंदर घर असावे,गाडी असावी,मुली चांगल्या शाळेत शिकावी. जीवन एकदाच मिळते ते चैनीत जगावे. या सगळ्यासाठी महत्त्वाचा पैसा. मग सुरु होते पैसे कमवण्यासाठी धडपड. या सगळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होते.
माणूस हा धाकाधाकीचे जीवन जगत आहे. प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी इतका गुंतलेला आहे की स्वतःच्या आवडीनिवडी छंद जोपासण्यासाठी वेळ मिळत नाही याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.
पौष्टिक खाण्याने शारीरिक पोषक आहार क्वचितच मिळतो. यात व्यायाम करायला वेळ नाही सभोवताली प्रदूषण. माणसांना या गोष्टीची जाणीव नाही झाली जीवन जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा. बऱ्याच लोकांना कुटुंबासाठी वेळ नाही,स्वतःसाठी वेळ नाही,पालकांना मुलांसाठी वेळ देता येत नाही
प्रत्येक जण आपल्या परीने आपल्या मुलांचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी धडपडत आहे पण आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे.
सतत बसून काम करताना वजन वाढणे, मग आजार शरीर व्यापून घ्यायला तयार आहेत. डायबिटीज, कोलेस्ट्रॉल हे तर फॅशन चें रोग झाले आहेत.या सगळ्यांसाठी कारणीभूत आहे व्यायामाचा अभाव.
सतत बसून काम करताना वजन वाढणे, मग आजार शरीर व्यापून घ्यायला तयार आहेत. डायबिटीज, कोलेस्ट्रॉल हे तर फॅशन चें रोग झाले आहेत.या सगळ्यांसाठी कारणीभूत आहे व्यायामाचा अभाव.
पैसे कमावणे जितके आवश्यक आहे तितकेच महत्त्वाचे आहे आरोग्य. शरीराने साथ दिली तरच पैसा कमवण्यासाठी तुम्ही कष्ट करू शकता.सतत काम ताणतणाव त्यातून थोडा वेळ दररोज स्वतःला कुटुंबाला द्या, मग बघा कसं हलकं वाटतं आणि समाधान वाटतं.
काही लोक पैसा वाढला की अहंकारी होतात. मी खूप श्रीमंत आहे मला कोणाची काय गरज असे गैरसमज करून घेतात आणि नाती गमावतात. पैसा टिकून राहण्यासाठी नाहीच,आज आहे उद्या नाही. या सगळ्यात आयुष्य जगायला विसरू नका आरोग्य कुटुंबाना ती विसरू नका. आयुष्य एकदाच मिळते ते खऱ्या अर्थाने जगायला शिका. जवळच्या व्यक्तींना कुटुंबाला वेळ द्या. छंद जोपासा. त्यामुळे ताणतणाव कमी होतो शिवाय आरोग्यही चांगले राहते.
करोना सारख्या आजाराने विश्वाला हलवले आहे यामध्ये कुणाचे आयुष्य किती असेल हे कोणालाही माहिती नाही. आलेला प्रत्येक क्षण आनंदाने जगा. फक्त पैशाच्या मागे धावत असताना आयुष्य जगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर पैशाची गुंतवणूक स्वतःचा विमा आरोग्य विमा स्वतःच्या गाडीचा विमा घराचा विमा प्रवासाचा विमा काढायला विसरू नका. मी श्वेता अंबुर्ले 🙏 माझा ब्लॉग जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि मला या नंबर वर 7039226921 कॉल करा.https://www.facebook.com/shweta.amburle थँक्यू थँक्यू थँक्यू 🙏🙏




Good
ReplyDeleteखरं आहे mam कुठल्याही problems मध्ये आपण आनंदी राहायला हवं.लाईफ एंजॉय केला पाहिजे .thank you for motivational Blog🙏🏻
ReplyDeleteआरोग्याची काळजी खरच खूप महत्त्वाचे आहे👌
ReplyDeleteमस्त श्वेता ताई
ReplyDeleteVery true.. Health is wealth..
ReplyDeleteपैसा तर पाहिजेच, परंतू त्याचबरोबर तब्बेतीचीही काळजी घ्यावयास हवी, हे अतिशय मार्मीक पध्दतीने ब्लाॅगमध्ये विश्लेषण केले आहे.नक्कीच तुमचा सल्ला घ्यावयास आवडेल.
ReplyDelete