पैसा की प्रेम
पैसा की प्रेम
नमस्कार🙏
असे म्हटलं जातं प्रेमासमोर कितीही पैसा ठेवला तरी तो फिका पडेल. मात्र काही संशोधन आणि प्रेमावर पैशाचा किती प्रभाव पडतो यावर संशोधन केलं. प्रेमात देखील पैसा बोलतो अशा समोर नातं नेहमी कठोर असते. पैसा आणि प्रेम हे दोन्ही शब्द लहान आहेत. मात्र त्याचा अर्थ खुप खोल आहे. काहीजण पैशासाठी आपल्या कुटुंबाला सोडून जातात. त्यासाठी कुटुंबाचा त्याग करतात. यापुढे जगभरातील संपत्ती कमी पडतील, पण काय करोडो रुपयाचे प्रेम विकत घेता येतं का?
पैसा आज प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. जेव्हा लग्नासाठी मुले शोधतात तेव्हा पहिल्यांदा त्याचा पगार पाहिला जातो. लग्नानंतर आपल्या मुलीला चांगलं आयुष्य मिळावं प्रत्येकाची इच्छा असते. आजच्या जगात माणूस पैशाच्या मागे धावतो, अशावेळी कुटुंबापासून लांब राहावे लागते. पैसा माणसाची गरज आहे पण प्रेम देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आज दिवस-रात्र काम करून आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवत असतो, मात्र त्यातूनही तो कुटुंबाला सुखी ठेवू शकत नाही.
काही संशोधनात असे समोर आले आहे की ज्या लोकांना पैसा आधी वाटतो त्यांची पत्नी मुले यांच्या प्रती नकारात्मक भूमिका असते. काही सर्वेत अशी गोष्ट समोर आली की मुलींना लग्नाकरिता फायनान्स क्षेत्र किंवा आयटी क्षेत्रातील व्यक्ती जोडीदार निवडला जातो. मार्केटिंग क्षेत्रातील मुलाना कमी मागणी आहे.70% मुली आपल्या जोडीदाराचा पगार 50 हजार ते एक लाख रुपये असावा असा विचार करतात. जरी प्रत्येकाच्या जीवनात पैसा महत्त्वाचा असतो परंतु असे बरेच लोक आहेत या संकल्पनेबद्दल भिन्न मत ठेवतात. असे वाटते की पैसा सर्व काही नसतो. पैसा ही गोष्ट असू शकत नाही परंतु आयुष्यातील आनंद मिळवण्याचे साधन आहे. पैशामुळे आपल्याला आत्मनिर्भर राहण्याची शक्ती मिळते. त्यापेक्षा चांगली भावना पण मिळते.
पैसा आपल्याला आर्थिक समस्यांना संपवण्याची क्षमता देते. परंतु आपण योग्य मार्गाने ते व्यवस्थापित केले तरच हे शक्य आहे. आपण कमी पगाराचा आपली सर्वाधिक गुंतवणूक करू शकतो, असे बरेच लोक आहेत जे भरघोस पगार होतात परंतु गैर व्यवस्थेमुळे कर्जत बुडतात. त्यामुळे असंख्य अडचणी उद्भवतात. तर वित्तपुरवठा चे अचूक व्यवस्थापन असल्यामुळे सुनिश्चित केले तर आपण तणावमुक्त होऊ शकतो.



छान माहितीपूर्ण मार्गदर्शन
ReplyDelete