पैसा की प्रेम
पैसा की प्रेम नमस्कार🙏 असे म्हटलं जातं प्रेमासमोर कितीही पैसा ठेवला तरी तो फिका पडेल. मात्र काही संशोधन आणि प्रेमावर पैशाचा किती प्रभाव पडतो यावर संशोधन केलं. प्रेमात देखील पैसा बोलतो अशा समोर नातं नेहमी कठोर असते. पैसा आणि प्रेम हे दोन्ही शब्द लहान आहेत. मात्र त्याचा अर्थ खुप खोल आहे. काहीजण पैशासाठी आपल्या कुटुंबाला सोडून जातात. त्यासाठी कुटुंबाचा त्याग करतात. यापुढे जगभरातील संपत्ती कमी पडतील, पण काय करोडो रुपयाचे प्रेम विकत घेता येतं का? पैसा आज प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. जेव्हा लग्नासाठी मुले शोधतात तेव्हा पहिल्यांदा त्याचा पगार पाहिला जातो. लग्नानंतर आपल्या मुलीला चांगलं आयुष्य मिळावं प्रत्येकाची इच्छा असते. आजच्या जगात माणूस पैशाच्या मागे धावतो, अशावेळी कुटुंबापासून लांब राहावे लागते. पैसा माणसाची गरज आहे पण प्रेम देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आज दिवस-रात्र काम करून आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवत असतो, मात्र त्यातूनही तो कुटुंबाला सुखी ठेवू शकत नाही. काही संशोधनात असे समोर आले आहे की ज्या लोकांना पैसा आधी वाटतो त्यांची पत्नी मुले यांच्या प्रती नकारात्मक भ...