आर्थिक समृद्धी साठी गुंतवणूक आणि बचत
नमस्कार 🙏
पैसे कमावले आणि खर्च केले असं म्हणतात वाचवलेला एक रुपया कमाई केलेल्या एक रुपया प्रमाणेच असतो. अनेकदा लोक कमवत असतात आणि खर्च करत असतात पण भविष्यासाठी सेविंग कसे करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो खरच इतका असतो की पैसे राखून कसे ठेवायचे त्यासाठीच जाणून घेऊया स्मार्ट टिप्स.
नमस्कार🙏 श्वेता अंबुर्ले, फायनान्शिअल सेक्युरिटी एक्सपर्ट, समृद्धीचे श्वेता पत्र या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. गेली पंचवीस वर्षे मी या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे. पुढील पाच वर्षात मला 5000 कुटुंबांची आर्थिक समृद्धी करायची आहे हे माझे ध्येय आहे.
तुमच्या घराचं बजेट आगोदर पक्क करा, यात सर्व प्रकारची बिल Emi रेशन फीस यांचा समावेश असतो. तुमच्या कमाईतला मोठा हिस्सा यात जाईल मग तुम्हाला अंदाज येईल किती पैसे उरले ते शिल्लक राहिलेल्या पैशाचे प्लॅनिंग करायचे आहे.
पैसे जमा करा. ही बचत तुमच्यासाठी खुप उपयोगी आहे. इन्शुरन्स काढला असेल क्रेडिट कार्ड असेल एफडी असतील आणि शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल. पण तरीही तुम्ही दर महिन्याला तुमच्या कमाईचे काही पैसे इमर्जन्सी फं डात ठेवले पाहिजेत ही रक्कम तुम्हाला अचानक नोकरी गेली किंवा आजारपणासाठी उपयोगी येऊ शकते. या रकमेला तुम्ही सेविंग अकाउंट मध्ये अशा प्रकारे ठेवा की लगेच काढता येऊ शकतील. तुमच्या कमाईतला दहा टक्के हिस्सा ठेवणे गरजेचे आहे.
हातात आलेल्या पैशाचा उपयोग कधी आणि कसा करायचा? तुम्ही आर्थिक नियोजन करा तुमचा महिन्याचा खर्च आणि तुमच्या आनंदासाठी केला जाणारा खर्च याचा प्लॅनिंग करा. लॉन्ग टर्म चें खर्च म्हणजे कार खरेदी घर खरेदी करणे मुलांचे शिक्षण लग्न यासाठी लागणाऱ्या पैशाचे नियोजन करा अनेक योजनांबद्दल माहिती करून घ्या. कुठली पैसे गुंतवायचे असतील तरी रिटर्न विचार करा.
गुंतवणूक करण्याचे महत्त्व ओळखा. तुमच्या कमाईतला काही हिस्सा गुंतवणुकीसाठी गेला पाहिजे. शेअर बाजार म्युच्युअल फंड एसआयपी यासारख्याया स्कीम चा अभ्यास करून पैसे गुंतवा. त्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. त्याच्यााबरोबर असून काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता कर.महत्त्वाचें तुमचे खर्च लिहून ठेवा. तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष ठेवा. बाजारातल्या चढ-उतारांचा त्यावर कसा परिणाम होतो ते बघा. गॅरंटी वॉरंटी पर्चेस अशा सर्व रिसीट एकत्र फाईल करून ठेवा. क्रेडिट कार्ड घराचा किंवा कारचा हप्ता या गोष्टी वेळीच हाता वेगळ्या करा. जास्त कर्ज घेण्याचे टाळा. तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले तर तुमचे आयुष्य सहज आणि सोपे होईल. तर मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण अंमलात आणल्या्त र आपला जीवन आनंदी होईल.
माझा हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा. धन्यवाद 🙏karahttps://www.facebook.com/shweta.amburle




Thank you mam तुमच्या ब्लॉग मुळे आम्हाला छान investment tips मिळतात ज्याचा आम्हाला नाकी फायदा होणारच ही खात्री आहे.
ReplyDeleteGreat 👍Information
ReplyDeleteKhup chan information 👌
ReplyDeleteKhup Chan Tai
ReplyDelete