Mutual Fund
नमस्कार 🙏
मागच्या ब्लॉगमध्ये आपण कोण कोणते विचार फंड आहे ते पाहिले.
म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करताना लोक अशा प्रकारच्या चुका करतात, ते आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत.
सर्वच गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करताना चुका होऊ शकतात mutual fund याला अपवाद नाही.
1) उत्पादन नीट समजून न घेता गुंतवणूक करणे. उदाहरणार्थ इक्विटी फंड हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी केला जातो, पण गुंतवणूकदारांना अल्पमुदती मध्ये सहज चांगला परतावा हवा असतो.
2) जोखीमितील घटक जाणून न घेता गुंतवणूक करणे. सर्व म्युचल फंड मध्ये काही जोखमीचे घटक असतातच. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक करण्याआधी ते समजून घेतले पाहिजे.
3) योग्य रकमेची गुंतवणूक न करणे काही वेळा लोक निष्काळजीपणे गुंतवणूक करतात. यासाठी त्यांचे नियोजन किंवा उद्दिष्ट नसते, अशा वेळी केलेल्या गुंतवणुकीचा योग्य परिणाम साधला जात नाही.
4) फार लवकर रोख रकमेत रूपांतरित करून घेणे काहीवेळा गुंतवणूकदारांचा धीर सुटतो. किंवा ते एखाद्या गुंतवणुकीला परतावा देण्यासाठी वेळ देत नाही आणि वेळेआधीच रोख रकमेत त्याचे रूपांतर करून घेतात.
5) आणि गुंतवणूकदार स्वतःची विवेकबुद्धी वापरत नाहीत बाजार किंवा मीडियामधील अफवा ऐकून चुकीचे निवड करतात.
6) नियोजन न करता गुंतवणूक करणे ही बहुदा सर्वात मोठी चूक ठरते. गुंतवलेल्या प्रत्येक रुपयांमध्ये नियोजन आणि उद्दिष्ट असणे गरजेचे आहे.
Mutual Fund च्या साह्याने मी कोण कोणत्या प्रकारची उद्दिष्ट साध्य करू शकतो.
म्युचल फंड असे वैशिष्ट्य आहे की आपले आर्थिक उद्दिष्ट कोणतेही असो आपल्याला त्यासाठी योग्य ती मिळू शकते. जर आपली आर्थिक उद्दिष्टे ही दीर्घकालीन असतील जसे की आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन किंवा आपल्या मुलांच्या भविष्यातील शिक्षणाचा खर्च तर इक्विटी फंड मधील गुंतवणूक हा योग्य पर्याय ठरू शकतो. आपले उद्दिष्ट हे नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यासाठी फिक्स रकमेच्या फंडाचा विचार करून केला जाऊ शकतो.
आपल्याला अचानक मोठा आर्थिक लाभ झाला तर ते पैसे आपण कुठले गुंतवू इच्छिता याचा निर्णय व्हायचा असेल तर आपण लिक्वीड फंड चा वापर करू शकतो. लिक्विड फंड बचत खात्यासाठी किंवा तुमचें खेळते भांडवल चालू खात्यात ठेवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून विचार करता येईल.
म्युचल फंड हे कर वाचवण्यासाठी काही गुंतवणुकीचे पर्याय सुचवत असतात. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीमELSS हे विशेषता त्यासाठी तयार करण्यात आले आहेत. व्यावहारिक दृष्ट्या आपल्या गुंतवणुकीचा सर्व आवश्यकता पूर्ण करण्यासाठी म्युचल फंड हे एकमेव ठिकाण आहे.




खूप छान माहिती.
ReplyDeleteMast👌
ReplyDeleteKhup mast 👌
ReplyDelete