नमस्कार,
समृद्धी म्हणजे काय?
त्या विचारांची, आचारांची,निरोगी जीवनाची पैशाचे, नातेसंबंधांचीतसेच सामाजिक नैतिकतेची.
तुम्हाला सुख आणि समृद्धी हवे असेल तर आपण आयुष्यात नेमकं काय खायला पाहिजे त्याने आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
मूर्ख माणसाचा अनादर केला जातो आणि ज्ञानी माणसाचा सन्मान केला यासाठी ज्ञानी माणसाने केलेल्या सूचना आचरणात आणल्या जातात.तिथे अन्नधान्याची कमी कधीच आढळत नाही. अन्नाचा एकही कण वाया घालवत नाही तिथे अन्नाचा सन्मान राखला जातो अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करते. ज्या ठिकाणी अन्न वाया घालवले जाते तिथे कधीही सुख समृद्धी नांदत नाही आणि अन्नधान्य टिकत नाही.
नातेसंबंध🌹: पती- पत्नीच्या नात्यामध्ये कुठलाही कडवटपण नसतो फक्त प्रेम असते अशा दांपत्य कडे धनधान्य समृद्धी सुख कायमच राहते. पती-पत्नीच्या नात्यामध्ये कडवटपणा असे ल तिथे लक्ष्मी कधी ही वास करत नाही.
पैशाची बचत : सुखसमृद्धी हवी असेल तर पैशाची योग्य साठवण करणे तसेच चांगल्या कामासाठी वापर करणे गरजेचे आहे. बचत आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे नियोजन करून आपल्या पूर्ण जीवनातल्या सगळ्या गरजांसाठी आवश्यक आहे. पैसा हा नेहमी चांगल्या मार्गाने गुंतवणूक करणेेे गरजेचेआहे.
आपलं कुटुंब सुखी असावे. कुटुंबातील सगळ्या सदस्यांचा आरोग्य चांगलं राहावं. निरोगी आयुष्य हे सगळ्यात मोठे सुख आहे. ज्ञान आणिि समृद्धीची ची पहिली अट म्हणजे आरोग्य. चांगले आरोग्य म्हणजे जीवनाची ऊर्जा आहे. जो मनुष्य पण मनाने निरोगी असतो. प्रत्येक क्षण जगतो. तणावपूर्ण जीवन अनियमित जीवनशैलीमुळे माणसाााााला अनेक रोग जडत आहेत. पथ्यन पाळणे, अयोग्य संगत, आळस व्यसन आणि संताप या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवल्यास आपल्याला खऱ्या अर्थाने आरोग्य प्राप्त होते.
आरोग्या नंतर कुटुंबाचें दुसरे म्हणजे घरातील पैसा. गरीबी म्हणजे जीवनातील नियतीने केलेली थट्टाच होईल. अनेक बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे. नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावे. अनैतिक मार्गाने कमावलेला पैसा नेहमीच कुटुंबासाठी घातक असतो.
नमस्कार🙏
मी श्वेता संजीव अंबुर्ले. फायनान्शिअल सिक्युरीटी एक्सपर्ट. समृद्धी श्वेता पत्र या संस्थेची मी संस्थापिका आहे. गेली पंचवीस वर्षं मी या कार्यक्षेत्रात काम करत आहे. पुढील पाच वर्षात मला पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्ध करणे हे माझे ध्येय आहे.
गुरु आणि परमेश्वरावर असलेला विश्वास. एखादी गोष्ट साध्य करायचे असेल तर त्यामागे काही प्रेरणा असावी लागते. गुरु आणि परमेश्वर आपल्याला ही प्रेरणा देतात. आपल्याला सिद्ध करायचे असेल तर श्रद्धा पाहिजे.
तसेच स्वच्छ आणि पवित्र चारित्र्य असलेली स्त्री हा कुटुंबाचा आधारस्तंभ असते. स्त्री मुळेच घराला घरपण येते. ज्यामुळे घराण्याचा नावलौकिक वाढतो. स्त्री प्रत्येक रुपात वंदनीय आहे. स्त्री शिक्षिका आहे, मुलांवर संस्कार करण्यापासून ते कुटुंबातील सदस्यांना योग्य मार्ग दाखवणारी उत्तम मार्गदर्शक आहे.
सामाजिक प्रतिष्ठा: तिचा स्पष्ट चारित्र्य कुटुंबासाठी लायक लाभदायक आहे. तोपर्यंत व्यक्ती प्रामाणिकपणा आणि इमानदारी सच्चेपणा हे गुण येणार नाही तोपर्यंत त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही. सामाजिक व्यवस्थापन जीवना सारखेच असून ते परस्पर सहकार्याच्या आधारावर टिकले आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो. सेवा म्हणजे मानवी मूल्यांचा गोडवा आहे.
व्यक्तिमत्व विकास व्यक्तीसोबत त्याचा व्यक्तिमत्त्व हे जोडलं गेलेलं असतं. व्यक्तिमत्वाला आकार हा आपल्याला झालेल्या संस्कारावर घडलेला असतो. आपण नेहमी चांगली स्वप्न उराशी बाळगणे, महत्वाकांशी रहाणे हेच जीवनाचे जीवन मूल्य आहे.
मित्रांनो, तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला अ सेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या मित्राना सांग. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, त्याबद्दल काही माहिती असेल तर माझं समृद्धीचे श्वेतपत्र या ग्रुप ला जॉईन व्हा.🙏🙏
खाली दिलेल्या लिंक वर जॉईन करा.
https://www.facebook.com/shweta.amburle
Comments
Post a Comment