स्वेच्छा निवृत्ती.

 स्वेच्छा निवृत्ती नंतरचे आर्थिक नियोजन कसे असावे ✍️
सध्याच्या काळात वयोमानानुसार अनेक जण निवृत्त होत आहेत अथवा काही कारणाने स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. यावेळी त्यांच्या हातात मोठी रक्कम येते. जरी ही रक्कम खूप मोठी असली तरी पुढील पंचवीस वर्षे वाढते मेडिकल खर्च या सगळ्याचा विचार करता मिळालेल्या पैशाचे वेळीच योग्य नियोजन करणे

जरुरीचे आहे.  कष्टाने कमावलेली पुंजी अयोग्य मार्गाने गुंतवली गेली तर सन्मानाने जगण्या ऐवजी  लाचारीची वेळ येऊ शकत.

नमस्कार,मी श्वेता संजीव अंबुर्ले.  Financial Sequrity Expert, समृद्धीचे श्वेत पत्र या संस्थेची मी संस्थापिका आहे. गेली पंचवीस वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत आहे, पुढील पाच वर्षात मला पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्ध करायच हे माझं ध्येय आहे.

 स्वेच्छानिवृत्ती ची मिळालेली रक्कम पुढील प्रमाणे गुंतविली पाहिजे.

 आरोग्य विमा असणे, ही काळाची गरज आहे.  वैद्यकीय खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मोठे आजारपण आपली जमापुंजी क्षणार्धात नाहीशी करू शकते. आरोग्य विमा असल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आजारपणात त्याची  मदत होते. यामध्ये आपले पूर्ण कुटुंब यांचा समावेश असू शकतो. सर्वात कमीत कमी किमतीत मिळणारा हा आरोग्य विमा असून दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे.

 उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्यामुळे आपली सध्याची जीवनशैली का यम ठेवण्यासाठी नियमित उत्पन्नाची गरज आहे. जमा राशी सुरक्षित ठेवून वार्षिक व्याज देणारी सेविं स्किम घेऊ शकतो.

 पेन्शन योजना रक्कम दीर्घ् काळ गुंतून  रहते,. मासिक व्याज निरंतर मिळत राहते. विमा कंपनी म्युचल फंंड पेन्शन फंड यांच्याकडून ही योजना समजून घ्यावे. त्याचे व्याज करपात्र असते.

 मुदत ठेव योजना. बँक पोस्ट ऑफिस फायनान्स कंपनी, गृह कर्ज देणारी कंपनी, पतपेढी यांच्या योजना आहेत.
 तसेच सोने-चांदी,कमोडिटी,स्थावर मालमत्ता कर्जरोखे हे पर्याय उपलब्ध आहेत.
 सगळी गुंतवणूक आपण व जोडीदार यांचे नावे संयुक्त ठेवावे. वारस नोंदणी करावी.
 आपल्याला भेट म्हणून काही रक्कम द्यावी असे वाटत असेल तर आपल्या पश्चात ती जोडीदारास व वारसास आपल्या इच्छेनुसार मिळावी असे इच्छापत्र बनवून ठेवावे.
 आवश्यकता नसल्यास मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करू नये. नियोजन करताना पुढील पंचवीस वर्ष हे कायम लक्षात ठेवा.

 असे नियोजन केल्यास आपली स्वेच्छानिवृत्ती आनंदी समाधानी
निरोगी होईल. 
 हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना सांगा.  धन्यवाद🙏🙏

https://www.facebook.com/shweta.amburle
 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आर्थिक नियोजनाची दशसुत्री

दिवाळी बोनस