कृतज्ञता
कृतज्ञता कृतज्ञता ही मानवजातीला मिळालेली खूपच उत्कृष्ट देणगी आहे. ती निसर्गतः अवगत असलेली कला आहे, परंतु तिला समजून घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. निसर्गाप्रती,मनुष्य धर्माप्रती, पशुपक्षी, प्राणी, झाडे वेली, समुद्र या सगळ्यां प्रति कृतज्ञतेचे भाव असणे अगत्याचे आहे 🙏 नमस्कार🙏 मी श्वेता फायनान्शिअल सिक्युरीटी एक्सपर्ट. समृद्धी श्वेतपत्रिका संस्थेची संस्थापिका. पुढील पाच वर्षात पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्धी मिळवून देणे हे माझे ध्येय आहे. मला लावलेली देणगी कृतज्ञता तिचा मी सकाळी ब्रह्मा मुहूर्ता पासून स्वतःला लावून घेतलेले एक वळण आहे. ब्रह्मांडाचे मनापासून उपकार मानून त्याला धन्यवाद देणे हे माझे आद्यकर्तव्य समजते. आई-वडील, लाइफ पार्टनर, भावंड, मुलं, मित्र-मैत्रिणी, शेजारी, ओळखीचे अनोळखी, कलिग्ज, टीचर्स या सगळ्यांचे आभार मानून त्यांचे मी आशीर्वाद घेते. तसेच मला मिळालेले निरोगी सुंदर शरीरयष्टी या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आज पर्यंत मला या सगळ्यांनी भरभरून प्रेम दिले याचा मला अत्यंत आनंद आहे मी आभारी आहे. स्वतः स्वतःवर प्र...