आर्थिक नियोजनाची दशसुत्री
नमस्कार 🙏 चांगला आयुष्य जगायचं असेल तर पैसा हवाच. त्यासाठी आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे ते करताना पुढील मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. 1) आपल्या आयुष्याचा विचार करताना गुंतवणूक किती कालावधीसाठी करत आहोत, कालावधी पूर्ण झाल्यावर आपण गुंतवलेली रक्कम त्या वेळेस चे मूल्य किती असेल याचा अंदाज घ्या. त्यावेळेच्या महागाईचा विचार करणे खूपच गरजेचे आहे. 2) गुंतवणूकीची काळजी घ्या. बरेच गुंतवणूकदार एकदा गुंतवणूक केली की निर्धास्त होतात. त्यांना वाटते की परतावा तर मिळणार आहे या भ्रमात न राहता आपल्या गुंतवणुकीच्या सर्व बाबींवर नियमित आणि योग्य देखरेख ठेवली पाहिजे. 3) मुदतीवर करा विचार. गुंतवणूक करताना योग्य परतावा मिळण्यासाठी काही अवधी जावा लागतो. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या योजनेमधून कमी कालावधीत चांगल्या परताव्याची अपेक्षा करू नका. म्युचल फंड, फिक्सडिपॉझिट,पीपीएफ यासारखे गुंतवणुकीचे पर्याय दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर असतात. प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असतो. एवढी चा कालावधी दोन ते पाच वर्षे असू शकतो. पण विमा पॉलिसी चा मिळणारा रिटर्न ही दीर्घकालीन गुंतवणूकीवरच प्राप...